चार वर्षांपूर्वी ती हरवली आणि आज पुन्हा सापडली | Lokmat News Update | Lokmat Marathi News

2021-09-13 0

रमेश कुमार याची बहिण गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता होती. खूप शोध घेऊनही ती सापडली नव्हती. त्याच दरम्यान त्याने एका कंपनीत सेल्समनचे काम करायला सुरूवात केली. ते काम करत करत नकळत तो रेड लाईट एरियात गेला. तेथे त्याने आपल्या बहिणीला बघितले. त्यानंतर लगेचच त्याने पोलीसांना याबद्दलची माहिती दिली. खबर लागताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी रमेशची बहिण आणि आणखी एका मुलीची या दलदलीतून सुटका केली. रमेशची बहिण ही बिहार येथील शिवहर जिल्ह्यातील मुळ रहिवासी आहे. तर दुसरी महिला ही झारखंड येथे राहणारी आहे. सुरूवातीला हरियाणातील एक महिला नोकरीचे आमिष दाखवून तिला बाखरी गावात घेऊन आली. त्यानंतर तिला विकले. दूसऱ्या महिलेला देखील १० वर्षांपूर्वी नोकरीचे आमिष दाखवून झारखंड मधून बिहार येथे आणण्यात आले होते. मात्र सुदैवाने रमेश तिथे पोहचला आणि त्याने पोलीसांच्या मदतीने या दोघींनी देहविक्रीच्या या दलदलीतून सुटका केली. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires